Wednesday, July 12, 2017

कथा - भक्ती

भक्ती 





सालाबाद प्रमाणे यंदाही पंढपूरचा  वारी सोहळा सुरु झाला.. अनेक पाऊलांचे  ठसे त्याच मार्गावर पुन्हा उमटू लागले.. वयाचे बंधन नाही किंवा भिन्नतेचे चिन्ह नाही.. पाऊले ज्ञानबा तुकारामाच्या गजरात आपली वाट सरत होते.. अनेक गाव, जिल्हा ह्या वारीतील पालख्यांची.. त्यातील वारकऱ्यांची आतुरतेने वाट बघत असत.. यंदा आषाढी महिन्या प्रमाणे रमजान चा महिना चालू होता.. गावात पालखी आली.. त्याचे नियोजन सागवती सर्व मुस्लीम बांधवानी केले.. संध्याकाळचा रोजा आपण वारकऱ्यांसोबत पिठलं-भारीने सोडायचं.. खरंतर अखंड विश्वात हिंदू आणि मुस्लिम हे कट्टर पण एका वारीच्या सोहळ्याला एवढा एकोपा म्हणजे शत्रुत्व म्हणून हिणविणाऱ्यांच्या तोंडावर एक चपराक म्हणावी लागेल.. तुकारामांचे वारीवरील काही ओळी आठवल्या "वर्ण अभिमान विसरता याती, एक ऐका लोटांगणी जाती "  खरंच एका वारीचा एवढा अनुभव त्या संतांनी देखील घेतला असावा म्हणून एकोपायची गणित आपल्या अभंगात आपल्या आचरणात त्यांनी आणली असावी.. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यत एक अवलिया राहतो.. संध्याकाळी पायाला घुंगरू बांधून.. विना - चिपळ्यांनी गवळण गातो.. संतांच्या अमूल्य प्रत्येक अभंग कीर्तनाच्या माध्यमातून मांडतो... ह्या अवलियाच नाव राजू बाबा शेख... शेख हे नावच जातीयतेला तडा देणारचं... लहानपणा पासूनच मंदिराच्या पायऱ्यांवर बसून कीर्तनाची त्यांची आवड निर्माण झाली.. धर्म मुस्लिम आहे आणि हा मंदिराच्या पायऱ्यांवर कसा ? असे जातीय आणि धर्म वाद्यांनी गावात प्रश्न उभे केले.. स्वतः राजू बाबा शेख ह्यांच्या घरातून देखील ह्या गोष्टीला विरोध झाला.. आपण मानव निर्मित धर्माचे जातीचे पशु आहोत पण ह्या विश्वाचा करता करविता एकच आहे असा त्यांचं मत तयार झाला... खरंच आहे म्हणा कारण ज्या संत एकनाथ महाराजाच्या असंख्य गौळणी राजू बाबा शेख ह्यांच्या मुखी नाचत असत त्याच संत एकनाथांच्या फकिरा ह्या सोंगी भारूडाचे ओळ ह्याच कशाची सख्त देणाऱ्या होत्या.. "हजरत मौला, हजरत मौला.. एका जनार्दनीं निशब्ध अल्ला, अस्सल वो ही विटपर अल्ला " संत एकनाथांच्या ह्या शिकवणीचा एवढा परिणाम म्हणजे संतांच्या शुद्ध विचारांचे एक सांगड राजू बाबांच्या चारित्र्यात दिसली.. भक्ती निव्वळ कोणत्याही धर्माच्या गाथेचं प्रभुत्व नाही ती मनाच्या शक्ती उगम स्थान आहे.. तिला कोणत्याची पद्धतीने करा मणी फक्त निखळ भावना असु द्या..

 
- शशांक बामनोलकर