Monday, June 26, 2017

शेवटी कावळा मेला....

शेवटी कावळा मेला.... नव्या जन्माचं कवच चोचीनं फोडलं श्वासच घोट पाहिल्याचं चाखलं उघडले डोळे घरातल्या कुणी दिसेना विश्वाचं चित्र उघड्या डोळ्यांनी पाहवेना... नुसता किलबिलाट झालं सोबतच्या पिल्लांचा दुरून आली एक कावळी , तिच्या चोचीत काहीतरी मावेना किलबिलत्या पिल्लं खाऊ देऊ लागली पाणावलेल्या डोळ्यात ती माझ्या कडे पाहू लागली घास संपला चोचीतल्या कुंपणाचा नव्यासाठी पुन्हा ती उडून गेली... दिवस असेच सरले होते, कोवळ्या शरीरावर नवे पिसांचे झालर चढले होते.. पंखात बळ साठवून स्वप्न धैय गाठायचे उडण्याआधी भीती समाज कावळ्यांचे.... एकवटले मन घेतली एक झेप कोसळले शरीर जमिनीवर थेट सावरले स्वतःला उघडले डोळे पाहुनी परिसर मी चक्क झाले.. आला एक माणूस मला पाहून उचलले मला करुणा करून घोळका क्षणात जमला माझ्या अवती भवती स्पर्श झाला मानवाचा ती जात त्यांना पापी होती... झाली घोळक्यांची पंचायत किलबिलाट कर्कश सुरु झाला. पडलेल्या माझ्या देहाला चोचीचा मारा झाला... प्रत्येकानी किमान एक एक मारा केला शेवटी कावळा मेला... - शशांक बामनोलकर

No comments:

Post a Comment