Tuesday, June 27, 2017

- होडी - *कथा*

- होडी -




रोजच्या धाव पळीच्या जीवनात आपण स्वतःच्या अस्तित्वाला कुठेना कुठे संशोधात असतो... आपण स्वतःला हुनारकडे दुर्लक्ष करतो.. मागच्या आठवणी सहज खोडून आपण पुढच्या ओव्या इतक्या निरर्थक लिहतो कि, त्याचा मागच्या व आजच्या घटनेचा काहीच संबंध लागत नाही...  पावसाचे दिवस होते..  प्रथे प्रमाणे मुंबई सारख्या शहराला पुराचं अस्तिस्त्व रेंगाळत होत.. नेहमी प्रमाणे यंदा जरा उशीर झाला घरी यायला.. घरात अंधार होता. आधी वाटलं लाईट गेली असावी.. जवळपास १० -१०.३० झाले होते.. घराचा दरवाजा अलगद उघडला.. बायको पोरांना मांडीवर झोपवत होती.. मुलं वाट बघून जेवून शांत झोपले.. बायको मात्र वाट पाहत होती.. बाहेर मुसळधार पावसाचं आवाज नको.. म्हणून तिने दार बंद केले.. आणि मुलांना झोप लागत नव्हती म्ह्णून लाईट बंद केली होती.. चिंब भिजले कपडे बदलून मी जेवणासाठी बसलो.. भर पावसात गरम गरम जेवण बायकोनी वाढलं.. तीही  होती सोबत.. दोन दोन घास एकमेकांना भरवत जुन्या आठवणी ताज्या रंगवत होतो.. जेवण संपलं आणि आम्ही दोघं झोपण्याच्या तयारीत होतो.. मी खिडकीत पाहिलं मंद प्रकाशानं मन वेधलं.. काही सावल्या तिथे गोंगाट घालत होत्या.. तेच पाहायला खिडकी जवळ बसलो.. समोरच्या फूट पाथवर एक दारिद्र्य लाभलेलं ओसाड झोपडं होत.. तिथे लहान लहान किमान ४-५ वर्षाची पोरं पावसात भिजत होती.. घरात कधी जेवण मिळेल किंवा नसेलही.. तरी चेहऱ्यावर एक सर्वसंपन्न श्रीमंतीलाही भिकारी समजेल असा होता.. ती ४-५ वर्षाची ३-४ पोरं आणि त्यांचे आई-बाप.. पावसाचा असा आनंद घेत होते जणू तो पहिल्यांदाच पडला असावा.. त्या लहान सहानं पोरांना त्यांच्या आई बापांचं असा सहवास पाहता माझी नजर माझ्या घराच्या भिंतीवर वळली..
भिंतीवर टांगलेल्या चौकटीतल्या प्रतिमा पाहताच डोळे टचकन भरले.. जणू पावसाचे थेंब माझ्या डोळ्यांनी उधार घेतले असावे.. ते कुटुंब पाहता मला माझ्या आई वडिलांची आठवण भेडसावायला लागली... असाच लहान असताना.. जवळ पास ५-६ वर्षाचा.. एकदा शाळेतून घरी आलो.. भर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत आजूबाजूची पोर.. ह्या मेघ मल्हाराचा स्वर्ग सहवास खेळत होते.. ओले चिंब शाळेचे कपडे.. पाण्यात पडणे - धावणे - पावसाच्या पाण्याने घराच्या छपऱ्याखाली भिजणे.. स्वतः भिजणं आणि दुसऱ्याला भिजविणे.. हा आनंद खूप भेडसावत होता.. त्यात समोर आजूबाजूच्या पोरांनी कागदाच्या होड्या पाण्यात सोडू लागले.. हे पाहत माझा हट्ट शिगेला गेला.. आई बाबांसमोर "मलाही अशा होड्या बनविण्याचा हट्ट केला".. कसा बसे घरात असलेले कागद आईने जमा केले.. कागदाच्या घड्या घालायला आईनी तर घडी उघडायची कशी ती बाबानी शिकवली.. आणि त्यांनी तयार केलेली..हि होडी मी पाण्यात सोडली.. आयुष्याची ३५ वर्षे उमटून गेली तेव्हा कळलं ह्या घड्या.. संस्कारांच्या घड्या तुमच्या मातृत्व -पितृत्व देऊनच जात फक्त संकटाच्या अशा पावसात तिचा कसा उपयोग करता आला पाहिजे.. त्या कागदी होड्या आजही पहिला तरी आई बाबा त्यात दिसतात.. होडीचा पुढचं तो म्हणजे बाबा आणि मागचं टोक म्हणजे आई.. आणि मध्ये गर्वाने उंच मानेचं टोक म्हणजे मी.. जीवनाचं प्रवाह असाचना..  आठवणी चा अर्थ निवळ एका पावसाने आणला.. कोरड्या आठवणींना तोही ओला करून गेला..

- शशांक बामनोलकर
        

No comments:

Post a Comment