Thursday, June 29, 2017

अशी पावसाची सर - कविता


अशी पावसाची सर - कविता 

पावसाची लहर, वाऱ्याची कहर 
विजेच्या गोंगाटात , अशी पावसाची सर 

थेंब थेंब पावसाचा, ओला केला कण मातीचा 
सुखाड वसुंधरेवर, अशी पावसाची सर 

पाला पाचोळ्याचे रान, भेगा ओसाड हे वन 
क्षण पालटून बरसे, अशी पावसाची सर 

कोरड्या घशाला ना गिळे सुक्के दाणे,
रुतले पायी काटे अनावणे 
हिरवा पसरवले शाल, अशी पावसाची सर  

संसार त्यांचा खोपटाला बांधून 
भेसडलं आग त्यास 
आग विजवेना चोचीतले बुंद
दाटल्या आभाळी बहरली ,अशी पावसाची सर 


- शशांक बामनोलकर

No comments:

Post a Comment