Wednesday, June 28, 2017

* वारी * - कथा




- वारी - 

सकाळचे जवळपास ९ वाजले.. जॉबला जाण्याची धावपळ होती..adhalyach दिवशी आई वडिलांसोबत बराच वाद झाला होता..  टीव्ही चालूच होता..  त्यावर बातम्या चालू राहत होत्या.. काल पासून ते आता पर्यंत सर्व माहिती त्या छोट्या खोपट्यात मिळत होती.. माझं लक्ष दुर्लक्षित होत पूर्णपणे.. अचानक "विठ्ठल विठ्ठल , ज्ञानोबा माउली .. ज्ञानराज माउली तुकाराम " असा  गजर कानावर गोंगावात होता.. नकळत लक्ष तिथे खेचलं गेलं.. त्यात चित्रित होणार पालखी सोहळ्यात माझं मन रमत राहील.. तो जय घोष.. मृदूंग टाळ ह्यांची साथ.. वारकऱ्यांच्या मुखातून एक सूर.. वा।।.. मजा आली.. खरंच माणूस हा इतका एकत्र येऊ शकतो का ? असा प्रश्न पडला.. २८ युगे हा विठ्ठल ह्या पंढरपुरात स्थानापन्न झाला म्हणतात.. तेव्हा पासून आज पर्यंत खरंच हा प्रवास असाच टिकला आहे का ?.. "नाही भेदाभेद, संगी अंगी विठ्ठलाची साथ" भर पाऊस उन्हाळ तरीही हा मोह का ? कोण हा विठ्ठल ?.. का ह्याच्या भेटला मैलो मैल हि लोक पायी चालतात?.. अनेक ना अनेक प्रश्न मनाला पोखरू लागले.. भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर अपेक्षित मिळालेलं नाही.. समोर टीव्ही मधल्या त्या बातम्या संपल्या.. लक्ष घडाळ्याकडे गेलं तसाच उठून मी ऑफिसकडे धावत सुटलो.. उशीर झाला.. बॉस खूप भडकला होता.. मला कॅबिन मध्ये बोलावलं मी गेलो.. चिडलेल्या स्वभावातला बॉस सुरु झाला..
मी :- मे आय कॉमिन्ग सर..
बॉस : - या...
मी :- सर तुम्ही बोलावलं का ?
बॉस : - काय ? उशीर का ?
मी : - काही नाही ..
बॉस:- काही नाही म्हणजे ?.. आज मिटिंग होती तुमच्या मुले कॅन्सल झाली..
मी :-  माझ्यामुळे का ?
बॉस :- आजच्या मिटिंगच्या फाईलच तुमच्याकडे होत..
मी :- सो सॉरी सर .. मी विसरलो ...
बॉस:-  वा ।। छान.. आज तुम्ही सगळी कडून कंपनीचं नुकसान करणार आहेत का ? (निरुत्तर) जा आणि फाईल आणा..
मी :- ओक सर..
केबिनच्या बाहेर गप मान खाली टाकून, मी निघालो.. आपण स्वतंत्र का राहू शकत नाही ह्याचं आचार्य वाटलं.. कारण अर्थ साठी स्वार्थाची साथ आपल्याला जोडावी लागते हेच आपलं जगणं झालाय.. ऑफिसाच्या बाहेर पडलो.. टेन्शनच्या भरात थेट टपरी गाठली.. सिगरेटच्या धुरात स्वतःच्या आयुष्याचे स्वप्न ढगात रंगवत होतो.. खचलेल्या भुकेला, चहावर भागवत होतो बिंधासपणे... काही वेळ गेला. चिपळ्यांचा आवाज कानावर पडला.. पहिल्यांदा भास वाटला.. चहूकडे पाहिलं.. कोणी दिसलंच नाही.. पुन्हा वाजला.. नकळत उत्सुकता वाढली.. माझ्या पाठीला एक स्पर्श झाला..  एक आवाज आला.. "पोरा, भूक लागली हाय, काय देशील का खायला ?.." वळून पाहिलं..एक ८० वर्षाचं वृद्ध होते.. सोबत तंबोरा आणि चिपळ्या.. भुकेने आणि वयाच्या आवाज खूपच खालावलेला होता.. करुणेचा चेहरा उपाशी पोटाची साक्ष देत होता.. वयाच्या निष्क्रियतेचा अंग थरथरत होतं.. काही क्षण टक लावून पाहताच होतो.. डोळ्यांच्या सुखाड भेगा माझ्या डोळ्यांना पावत होते.. मी म्हटलं "बाबा, या इथे बसा.. काय खाणार तुम्ही ? " व्याकुळ भुकेचा चेहरा डोलला.. "काहीही दे.. पोटाला जरा आधार मिळेल असं" समोर उभ्या असलेल्या खवलीतून एक जेवणाचं ताट घेतलं.. ते त्या वयस्करकडे सोपवलं.. भरलेलं ताट हे पहिल्यांदाच पाहतोय असं एकंदरीत चेहऱ्यावर  उमटलं... थरथरलेले हाथ ताटात गेले, मुठीत घेतलेलं जेवण मुखाशी जाऊ लागले..   बघता बघता , जेवण संपले भरलेलं जेवण कण मात्र राहील नाही.. डोळे पाणावले.. बहुधा त्यांच्यात दडलेल्या भुकेला पाणी मी कुठे पाजलं  असावं त्याचा तो आनंद.. बराच अबोलक प्रसंग राहिलेल्यवर त्यांनी मलाच विचारलं "काय करतोस पोरा ?" मी म्हणालो "इथे ऑफिस आहे माझं"
वयस्कर - छान.
न राहता मला भेसळलेला प्रश्न विचारला
"बाबा , तुम्ही वारकरी वाटतात"
वयस्कर - हो
मी - मग तुम्ही इथे काय करतायत ?  वारीला गेलात नाही का ?
वयस्कर - पोरा, वाऱ्या मी बऱ्याच केल्या, घरात पोर बाळ व्हती .. संसार व्हता तिथं पर्यंत ठीक हाय.. आता न्हाय झेपत..
मी - आता कोण कोण असत ?
वयस्कर - कुणीच न्हाय
छान एक स्मित हास्य होत.. एवढा असून एक माणूस एवढा आनंदी कसा ? प्रश्नच होता..
मी - बाबा. घरदार नसताना कस होत जमत हे सगळं ?..
वयस्कर - जमवावं लागत , अंगाशी बळ साठवण लागत..
मी - मग तुम्ही वारी का बंद केली ?
वयस्कर - वारी म्हणजी नुसतं पायी चालून पांडुरंग पाहावा.. अशी न्हाय.. तळीं होणं हाय.. आपल्या अवती भवती, प्रत्येक जण हा आपल्यासारखाच असतु.. ह्याची जाण वारी मिळते बघ..
मी - मला वारीला जायचं आहे.. आज टीव्हीत पाहिलं तिथलं वाटेवर छान दिसत.. बघायचंय मला
वयस्कर - छान दिसतंय म्हणून बघायला जाऊ नकोस पोरा.. छान वाटलं तरच जा तिथे..
मी - हो बरोबर आहे तुमचं
वयस्कर - तुझ्या घरी आई बाप नाही काय रे?
मी - आहेत
वयस्कर - मग त्यांचं २-३ प्रदक्षिणा मार
मी - का ?
वयस्कर - आम्हा आई बाप त्यो विठ्ठल - रख्माई.. तुमचे हाय कि  आय बाप  त्यांचीच सेवा करा कि.. कशाला त्यासाठी वारी करताय..

हेच शब्द जरा बोचले मला.. काळ रात्री आई - वडिलांशी भांडण मला पण अस्वस्थ करत होत.. लक्ष त्याच भांडणांकडे वळलं होत, म्हणून मी देखील स्वतःच्या विश्वात पोरकं झालो होतो.. झालेला मनस्ताप आणि चढलेला आवाज.. त्रास किळस आणि बराच तंटा कानात घोरायला सुरु झाला.. डोळ्यात आसवांनी जागा घेतली..
तितक्यात त्या वयस्करने विचारलं "पोरा, काय झालं ? शांत का ? "
"काही नाही बाबा, पांढुरंगाच्या वारीला आठवता.. माझे कर्म चंद्रभागेत धुवत होतो"
आपली श्रद्धा, आपुली आणि बऱ्याच कल्पनेचे दोरे आपण बाहेरच्या जगात शोधात असतो.. विश्वाचा एक धागा घरच्या चौकटीत शोधणं आपण विसरतो...

- शशांक बामनोलकर

2 comments: